ब्रिटनला आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे आगामी काळात अर्थव्यवस्थेचे आकुंचन होवू शकते. ब्रिटन सरकार या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान ऋषी सुनक सरकारने मंदीवर मात करण्यासाठी अनेक पावले उचलण्याची घोषणा केली आहे. सुनक सरकारने ५,००० कोटी पाऊंड आर्थिक योजनेचे सादरीकरण केले आहे. यापूर्वी अर्थमंत्री जेरमी हंट यांनी सरकारच्या आपत्कालीन बजेटची माहिती दिली. त्यानुसार करांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, एनर्जी कंपन्यांवरील विंडफॉल टॅक्स २५ टक्क्यांवरून वाढवून ३५ टक्के करण्यात आला आहे. इलेक्ट्रिक जनरेटरवर ४५ टक्के तात्पुरता कर लागू करण्यात आला आहे. याशिवाय वार्षिक सव्वा लाख पाऊंड कमाई करणाऱ्या व्यक्तीही कराच्या विळख्यात येतील. यासोबतच सुनक सरकारने इलेक्ट्रिक गाड्यांवर २०२५ पासून एक्साईज ड्यूटी लावली जाणार नाही. जेरेमी हंट यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ऑटम स्टेटमेंट सादर केले होते. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी याचे समर्थन केले आहे. ब्रिटनमध्ये महागाई नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे सरकारने करांमध्ये वाढ केली आहे. माजी पंतप्रधान लिज ट्रस यांच्या मिनी बजेटमुळे सरकारला फटका बसला आहे.