मुंबई : भारतातल्या सगळ्यात मोठ्या असणाऱ्या पारले जी या बिस्कीट कंपनीतील 10 हजार लोकांची नोकरी बिस्कीट उद्योगात आलेल्या मंदीमुळे जाऊ शकते. एशियातील तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेत मंदी आल्यामुळे ऑटोमोबाइलपासून रिटेल प्रॉडक्ट पर्यंत प्रत्येक वस्तूची मागणी कमी होत आहे, ज्यामुळे कंपन्या कमी उत्पादनाबरोबरच नाइलाजाने लोकांनाही कमी करण्यावर भर देत आहेत. भारत सरकार ने आर्थिक विकासाला प्रोत्साहन द्यावे, अशी आशाही कंपन्या व्यक्त करत आहेत.
कंपनीचे कॅटेगरी प्रमुख मयंक शहा म्हणाले, 100 रुपये प्रति किलो किंवा त्यापेक्षा कमी किंमत असणाऱ्या बिस्कीटांवर जीएसटी कमी करण्याची मागणी आंम्ही केली आहे. सरकारने आमची मागणी मान्य केली नाही तर आंम्हाला कंपनीत काम करणाऱ्या 8 ते 10 हजार लोकांना कामावरुन कमी करावे लागेल. विक्री नसल्यामुळे कंपनीचे खूप मोठ नुकसान होत आहे. इतर बिस्कीट उत्पादकही मंदीमुळे बेचैन आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.