वॉशिंग्टन : जगातील या एका आव्हानात्मक वर्षाचा सामना करावा लागेल, कारण जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्था अमेरिका, चीन आणि युरोप मंदीचा सामना करीत आहेत, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जिवाने सीबीएसला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. आम्हाला वाटते की जागतिक अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग मंदीच्या फेऱ्यात असेल असा इशारा त्यांनी दिला. जॉर्जिया यांनी सांगितले की, २०२३ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अतिशय कठीण असेल.
COVID-१९ महामारी, भू-राजकीय संघर्ष, युक्रेन-रशिया युद्ध आणि उच्च महागाईमुळे व्याज दरात होणारी वाढ ही जागतिक आर्थिक मंदीची कारणे सांगितली जात आहेत. अमेरिका आणि युरोपबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, वॉशिंग्टनचा मंदी पासून बचाव होऊ शकतो. मात्र, युरोपमधील स्थिती अधिक निराशाजनक दिसत आहे. युरोपला युक्रेन युद्धामुळे खूप फटका बसला आहे. जॉर्जिवा यांनी सांगितले की, निम्मा युरोपियन संघ मंदीमध्ये असेल. आयएमएफच्या अनुमानानुसार, या वर्षी जागतिक विकास दर २.७ टक्के आहे, हा २०२२ च्या ३.२ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
त्यांनी सांगितले की, चीनमधील मंदीचा जागतिक स्तरावर भयानक प्रभाव पडेल. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था २०२२ मध्ये आपल्या कठोर शू्न्य कोविड धोरणामुळे कमजोर झाली आहे. त्यामुळे पुरवठा साखळी खंडीत झाली आहे. आणि व्यापार तसेच गुंतवणुकीच्या प्रवाहाचे नुकसान झाले आहे. आयएमएफ प्रमुखांनी सांगितले की, २०२२ मध्ये चीनच्या वाढीचा दर तेवढाच अथवा त्यापेक्षा कमी राहील अशी शक्यता आहे. त्यांनी असेही सांगितले की, गेल्या ४० वर्षात पहिल्यांदाच २०२३ मध्ये चीनचा वाढीचा दर जागतिक दरासोबत अथवा त्यापेक्षा कमी राहील. जॉर्जिवा यांनी सांगितले की, ही आशियाई अर्थव्यवस्थेसाठी “काफी तणावपूर्ण” कालावधी आहे. जॉर्जीवा यांनी सांगितले की, पुढील काही महिने चीनसाठी कठीण असतील. आणि चीनच्या विकासावर त्याचा प्रभाव नकारात्मक असेल. ते म्हणाले की, चीन हळूहळू उच्च स्तरावर आर्थिक कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.