महाराष्ट्रातील मराठवाडा सारख्या दुष्काळी भागातील ऊस शेती साठी तीन वाणांच्या चाचण्या विविध चार ठिकाणी सुरु आहेत. या मध्ये को-८५०१९,९८०१७, आणि ०९००४ या वाणांचा समावेश आहे. २०२१ मध्ये या वाणांची महाराष्ट्रातील दुष्काळी भागांसाठी शिफारस केली जाईल. या वाणांच्या चाचण्यांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत, अशी माहिती कोईम्बतूरच्या ऊस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. बक्शी राम यांनी पुण्यामध्ये कार्यक्रमामध्ये बोलताना दिली.
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितील वाणांच्या संशोधन आणि विकासाठी मराठवाड्यात २०१६ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार कोईम्बतूरच्या संशोधन केंद्रातील १८ वाणांच्या प्रकारच्या संशोधनातील को-८५०१९,९८०१७, आणि ०९००४ या तीन वाणांच्या चाचण्या कोपरगाव, नांदेड, जालना आदी ठिकाणी चालू आहेत.
यासोबतच उसाच्या को – ८६०३२ या वाणाला पर्याय आणि प्रभावी ठरणारा को – ११०१५ वाण लवकरच महारष्ट्रातील ऊस शेतीसाठी शिफारस करणार आहे. तामिळनाडू पेक्षा कोल्हापूर परिसरातील वातावरण या वाणाला पोषक असून किमान एक टक्क्याने साखर उतारा वाढेल, अशी माहिती कोईम्बतूरच्या ऊस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. बक्शी राम यांनी दिली.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.