उत्तर प्रदेशमध्ये इथेनॉल उत्पादनात वाढ

लखनौ : आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये राज्यात इथेनॉल उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी गेल्या आर्थिक वर्षातील एकूण इथेनॉल उत्पादनाची आकडेवारी जाहीर केली. त्यांनी म्हटले आहे की, राज्यात विक्रमी १३३.२९ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे. हरित इंधनाची वाढती मागणी पाहता, उत्तर प्रदेसात इथेनॉल उत्पादनासाठी डिस्टिलरींची संख्या वाढत चालली आहे. सद्यस्थितीत राज्यात ८५ डिस्टिलरी इथेनॉल उत्पादन करीत आहेत. उत्तर प्रदेशनंतर इथेनॉल उत्पादनात महाराष्ट्र आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो.

उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, २०१६-१७ या आर्थिक वर्षात राज्यात ४२.६९ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन करण्यात आले होते. आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ बिले वितरण सुवधा देण्यासाठी साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणेवर लक्ष देणे सुरू केले. गेल्या चार वर्षात व्यापार करण्यातील सुलभतेसह राज्यातील सहकारी आणि खासगी क्षेत्रात ३१ नव्या डिस्टिलरी स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यातील साखर कारखान्यांनी आधीच ऊस उत्पादकांना ७५ टक्क्यांहून अधिक बिले दिली आहेत. देशातील सर्वात मोठ्या इथेनॉल उत्पादन राज्य युपीमध्ये उसापासून उप उत्पादनाचा वापर व्यापक रुपात रसायने, औषध, जैवइंधन आणि मद्य उद्योगात केला जातो. उत्तर प्रदेशात उत्पादित होणाऱ्या इथेनॉलपैकी ५५ % पेक्षा जास्त इथेनॉल इतर राज्यांना विकले जाते. २०१८ मध्ये जैव इंधनाचे राष्ट्रीय धोरण लागू झाल्यापासून देशात इथेनॉलची मागणी वाढली आहे. सध्या देशात १० % इथेनॉल इंधनात मिसळले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here