हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
ब्राझिल: 2018-19 वर्षासाठी ब्राझिलमध्ये इथॅनॉल उत्पादन 23 टक्क्यांनी वाढून 33.58 बिलियन लिटरवर होऊ शकते , जे मागील वर्षाच्या तुलनेत 6.3 बिलियन लिटर जास्त आहे.
ब्राझिलियन नॅशनल कंपनी ऑफ सप्लाय (CONAB) यांनी हा आकडा जाहीर केला. 2015-16 वर्षात 30.5 बिलियन लिटर्सच्या इथॅनॉल उत्पादनाची उच्चांकी, नोंद झाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेच्या किंमती कमी झाल्यामुळे ब्राझीलमध्ये इथॅनॉल उत्पादनावर जोर देण्यात आला आहे. CONAB च्या मते, घरगुती बाजारात इथॅनॉल इंधनासाठी अधिक अनुकूल परिस्थिती, डॉलरमध्ये वाढ आणि तेलाच्या किमतींनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
गेल्या वर्षीच्या तूलनेमध्ये 633.26 मिलियन टनांच्या तुलनेत ऊसाचे उत्पादन 1.3 टक्क्यांनी घटून 625.2 मिलियन टन झाले आहे.तसेच, साखर उत्पादन 17.2 टक्क्यांनी घटून 31.35 मिलियन टन झाले आहे, मागील वर्षीच्या तुलनेत 6.5 मिलियन टनांनी कमी झाले आहे.