युद्धामुळे यंदा विक्रमी मक्का निर्यात शक्य, बिहारच्या शेतकऱ्यांना फायदा

नवी दिल्ली : भारतातील मक्का निर्यातीला गती मिळाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १० महिन्यांत २८.५ टक्के निर्यातीत वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे मक्का निर्यात उच्चांकी स्तरावर जाऊ शकते असे एक्स्पर्ट्सचे म्हणणे आहे. याचा सर्वाधिक फायदा बिहारच्या शेतकऱ्यांना होईल. मक्क्याच्या एकूण उत्पादनात २५ टक्के वाटा बिहारचा आहे. देशातील अनेक राज्यांत मोठ्या प्रमाणात मक्का शेती केली जाते. निर्यात वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. खरीप हंगामात सर्वाधिक मक्क्याची शेती केली जाते.

वाणिज्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या १० महिन्यात म्हणजे एप्रिल ते जानेवारी या काळात देसात मक्का निर्यात २८.५ टक्क्यांनी वाढून ८१.६३ कोटी डॉलरवर पोहोचली. गेल्या वर्षी समान कालावधीत मक्का निर्यात ६५.४८ कोटी डॉलर होती. बांगलादेश व नेपाळ भारतीय मक्क्याचे प्रमुख खरेदीदार आहेत. गेल्या दहा महिन्यात बांगलादेशने भारताकडून ३४.५५ कोटी डॉलरचा मक्का आयात केला आहे. नेपाळची आयात १३.२१ कोटी डॉलरची झाली. मक्क्याच्या इतर आयातदारांमध्ये व्हिएतनाम, मलेशिया, म्यानमार, श्रीलंका, भूतान, तैवान, ओमान यांचा समावेश आहे. तांदूळ आणि गव्हानंतर मक्का हे भारतातील प्रमुख तिसरे पिक आहे. याची शेती बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, तामीळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here