देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी ऐतिहासिकपणे आयातीवर अवलंबून असलेल्या झिंबाब्वेने स्थिर अन्न पुरवठ्याच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. या प्रयत्नांमुळे देशात गहू पिक उत्पादनांचा उच्चांक गाठण्याच्या स्थितीत आहे. प्र. कृषी मंत्री, व्हेंजेलिस हरिताटोस यांनी सांगितले की, देशात यंदा ३,८०,००० टन गहू उत्पादनाचा अंदाज आहे, जो देशाच्या गरजेपेक्षा २०,००० टनाने अधिक आहे. गेल्यावर्षी उत्पादीत करण्यात आलेल्या ३,००,००० टनापेक्षा हे उत्पादन अधिक आहे.
झिंबाब्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अपेक्षित अतिरिक्त उत्पादनामुळे छोट्या धोरणात्मक साठा निर्मितीचे उद्दिष्ट गाठण्यास मदत झाली आहे. देशात १९६२ मध्ये पहिल्यांदा गव्हाची पेरणी करण्यात आली होती.
कृषी मंत्री चिंता मसुका यांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला आम्ही सांगितले होते की, पुढील हंगामात आमचे गव्हाचे उत्पादन ४,२०,००० टन करण्याचा प्रयत्न असेल. मक्क्यानंतर देशात गहू हे सर्वात महत्त्वाचे पिक आहे.