मुंबई : चक्रीवादळ अम्फान नंतर आता पुन्हा आणखी एका चक्रवाती वादळाचे सावट भारतामध्ये घोंघावत आहे. अरबी समुद्रात उठणारे हे वादळ बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्राच्या किनारी धडकू शकते. हे वादळ पाहता महाराष्ट्र, गुजरात सहित तटवर्ती राज्यात सावधानतेसाठी पावले उठवली जात आहेत. प्रशासनाने मुंबई सहित ठाणे, पालघर आणि रायगड साठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने सांगितले आहे की, चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकल्यानंतर जोरदार वाऱ्यासह मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. या वादळात संभाव्य नुकसान टाळण्यासाठी राज्यात एनडीआरएफ च्या दहा टीम तैनात केल्या आहेत.
अनेक परिसरात पूराची शंका
हवामान विभागाने सांगितले आहे की, वादळ बुधवारी संध्याकाळी मुंबईपासून 110 किलोमीटर उत्तर किनाऱ्यावर धडकू शकते. त्यानंतर या वादळाचा वेग 115 किलोमीटर प्रति तास पासून 125 किलोमीटर प्रति तास होण्याची शक्यता आहे. आईएमडी नुसार, या वादळामुळे बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि मुंबई सहित अनेक ठिकाणी मोठा पाऊस पडू शकतो. केंद्रीय जल आयोगाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई आणि नाशिक मध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्र सरकार चे राज्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरबी समुद्रात येणाऱ्या या चक्रीवादळाबाबत सांगितले की, याचा परिणाम दक्षिण अरबी समुद्रावर अधिक होईल. यामुळे लोकांना अलर्ट करण्यात आले आहे. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई केली आहे. मुंबई , कोंकण , सिंधुदुर्ग परिसरातील समुद्र किनाऱ्यावरील सर्वांना अलर्ट केले आहे. एनडीआरएफ ची टीम तैनात आहे. मंत्र्यांनी सांगितले की, वादळाशी लढण्यासाठी पूर्ण तयारी आम्ही केली आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही केले आहे.
मुंबई मध्ये सरकारने लोकांना आवाहन केले आहे की, लोकांनी सकाळी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये. समुद्र किनारी राहणाऱ्यांनी सुरक्षित स्थळी जावे. रायगड आणि पालघर येथे एनडीआरएफ ची टीम तैनात आहे. वादळाशी निपटण्यासाठी पालघर मध्ये विशेष तयारी केली आहे. दरम्यान, वादळाला पाहून गृह मंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि वादळाशी निपटण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.