नेपाळमध्येही उसावर किडींच्या फैलावामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता

कंचनपूर : बेलौरी नगरपालिका विभागातील शेतकरी ऊसावरील किडींच्या फैलावामुळे चिंतेत आहेत. नगरपालिकेच्या कृषी विभागाचे प्रमुख सुमन राज भट्ट यांनी सांगितले की, ज्या शेतांमध्ये पाणी साठते, अशा ठिकाणी रोगांचा फैलाव दिसून येत आहे. लाल सड रोगामुळे १५ गावांतील शेतांमध्ये ऊसाला फटका बसला आहे. या किडींमुळे १० ते ८० टक्के ऊस नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हा रोग उसाच्या सीओ २३८ आणि सीओ २०८ या प्रजातींवर अधिक प्रमाणात दिसून आला आहे. लाल सड रोग हा उसावरील कॅन्सरप्रमाणे आहे, असे भट्ट यांनी सांगितले. या किडीला आळा घालण्यासाठी किटकनाशक उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

साखर कारखान्यांही शेतकऱ्यांना औषधे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांचे सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नगरपालिकेतील कृषी तंत्रज्ञ हरीश सेठी यांनी सांगितले की, लाल सड रोगाची लक्षणे जून महिन्याच्या मध्यापासून दिसून येतात. जर वेळेवर उपाय केले नाहीत, तर ऊस खराब होतो असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here