उत्तर प्रदेशमध्ये ऊस उत्पादकांमध्ये रेड रॉट रोगाची दहशत, ०२३८ जातीचे क्षेत्र घटले

कोल्हापूर : उत्तर प्रदेशातील ०२३८ या प्रजातीच्या उसावर कॅन्सरसदृष्य रेड रॉट (लाल सड) या रोगाची लागण झाल्याने तेथील ऊस उत्पादक हादरले आहेत. मात्र यामुळे उसाच्या उत्पादनात मोठी घट होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या रोगाचा फटका पंजाब, हरियाणा, बिहारमध्येही बसला आहे. उत्तर प्रदेशप्रमाणेच बिहार, पंजाब हरियाणा आदी राज्यांतही अशा प्रकारच्या रोगाचा फैलाव झाला असल्याने तेथेही शेतकरी या जातीच्या उसाऐवजी अन्य जातीच्या उसाची लागण करीत आहेत. किंवा अन्य पिकांकडे वळत आहेत.

रेड रॉट रोग आणि इतर कारणांनी २०२२-२३ च्या हंगामाच्या हंगाम तुलनेत २०२३-२४ च्या हंगामात ऊस लागवडीखालील क्षेत्रात २ लाख ६७ हजार हेक्टरनी घट झाली आहे. खरेतर उत्तर प्रदेश ऊस आणि साखर उत्पादनातील क्रमांक एकचे राज्य म्हटले जाते. मात्र, यंदा लाल सड रोगामुळे या रोगाचा फटका बसला आहे. युपीमध्ये याच जातीच्या बेण्याची लागण मोठ्या प्रमाणात होते. मात्र गेल्या एक दोन वर्षांपासून उसावर रेड रॉट या रोगाची लागण होऊ लागली. त्यावर प्रभावी औषधही नाही. त्यामुळे उसाची वाढ खुंटते असे सांगण्यात येते. सद्यस्थितीत उत्तर प्रदेशात सीओ ०२३८ बरोबरच ०११८, १३२३५, १५०२३, १४२०१ ५००९, १७२३१, ८२०२३,२१९ या जातीच्या उसाची लागणही केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here