दाट धुक्यामुळे सुरू झालेल्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी कॅथल सहकारी साखर कारखान्याच्या केन यार्डमध्ये जवळपास ३०० ट्रॅक्टर ट्रॉलींवर रिफ्लेक्टर बसविण्यात आले. विभागीय परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा जिल्हा परिवहन अधिकारी सत्यवान सिंह मान आणि साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक सतिंद्र सिवाच यांनी वाहनांवर रिफ्लेक्टर बसविण्याच्या कार्यक्रमास प्रारंभ केला. धुक्याच्या वातावरणात सर्व वाहनचालकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले. आपली वाहने संथ गतीने चालवावीत आणि नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले.
वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, लाईट व डिपरचा प्रयोग करावा आणि रात्रीच्या वेळी वाहन खराब झाले तर ते रस्त्याकडेला उभे न करता कोणत्याही मोकळ्या जागेवर न्यावे अशी सूचना देण्यात आली. यावेळी सहायक सचिव विभागीय परिवहन अधिकारी शीशपाल, कारखान्याचे मुख्य अभियंता ए. ए. सिद्दीकी, मुख्य रसायन तज्ज्ञ कमलकांत तिवारी, ऊस विभागाचे व्यवस्थापक रामपाल सिंह, ऊस अधिकारी देशराज सिंह, शमशेर सिंह, रमेश कुमार, रामफल शर्मा व धर्मपाल उपस्थित होते.