ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना बसवले रिफ्लेक्टर

अमरोहा : वाहतूक विभागाच्यावतीने धुके आणि थंडीचे वाढते प्रमाण पाहता ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉलीवर रिफ्लेक्टर, पट्टी अथवा लाल कपडा लावण्याची मोहीम राबविण्यात आली.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये ओव्हरलोड वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यातून अपघाताची शक्यता अधिक वाढल्याचे म्हटले जात होते. याची दखल घेवून परिवहन विभागाने मोहीम हाती घेतली. गजरौलापासून धनौरा रोडवील मलेशिया गावानजीक साखर कारखान्याजवळ थांबलेल्या ऊस घेऊन आलेल्या ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉलीवर लाल कापड, रिफ्लेक्टर पट्टी बसविण्यात आली. वाहन चालकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये वाहन सुरक्षितपणे चालविण्याबाबत जनजागृती करण्यात आली. एआरटीओ नरेश वर्मा यांनी सांगितले की, वाहतूरदारांनी लाल कापड अथवा रिफ्लेक्टर न बसवता वाहन चालविल्यास कारवाई केली जाईल. यासाठी दहा हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होवू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here