गेल्यावर्षीच्या ऊसाचे पैसे देण्यास साखर कारखान्यांकडून टाळाटाळ : स्वतंत्र भारत पक्षाची साखर आयुक्तांकडे तक्रार

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून गेल्यावर्षी गाळप झालेल्या उसाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे, त्याबाबतही सूचना द्याव्यात, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी साखर आयुक्त यांच्याकडे केली आहे. तसेच शासकीय नियमानुसार गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस उत्पादकांना उसाचा दर जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही कारखान्याने दर जाहीर केला नाही. त्यामुळे तातडीने दर जाहीर करण्याचा आदेश द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी दिवाळीपूर्वी सर्व कारखानदार शेतकऱ्यांना प्रतिटन ५० किंवा १०० रुपये देतात. मात्र यंदा हे पैसे दिले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्ज काढण्याची वेळ आली. गेल्यावर्षी साखरेचे दर वाढल्याने ज्या कारखान्यांनी ३ हजार प्रतिटनपेक्षा कमी दर दिला आहे, त्यांनी प्रतिटन कमी दर दिला, त्यांनी प्रतिटन १०० रुपये आणि ३ हजारपेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांनी प्रतिटन ५० रुपये दर देण्याची मागणी संघटनांनी केली होती. कारखान्यांनी ही मागणी मान्य केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील काही अपवाद वगळता, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील बहुसंख्य कारखान्यांनी पैसे दिले नाहीत.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here