अल्कोहोलवर आधारीत सॅनिटाइजर उत्पादन करणाऱ्या साखर कारखान्यांना हवी आहे निर्यातीची परवानगी

लखनऊ: चीनी मंडी

उत्तर प्रदेशामध्ये हॅन्ड सॅनिटाइजर निर्माण क्षमता प्रतिदिन 300,000 लीटर पोचली आहे आणि आता साखर कारखान्यांनी अल्कोहोल वर आधारीत सॅनिटाइजर निर्यातीची परवानगी मागितली आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या फैलावाला नियंत्रीत करण्यासाठी घरगुती बाजारातील उपलब्धता तशीच ठेवण्यासाठी 6 मे ला अल्कोहोल वर आधारीत सॅनिटाइजर च्या निर्यातीवर प्रतिबंध घातला होता. गैर अल्कोहोल वर आधारीत सॅनिटाजर च्या निर्यातीसाठी परवानगी दिली गेली आहे.
सध्या यूपीमध्ये 87 प्लांट व्यावसायिक रुपात हॅन्ड सॅनिटायजर ची निर्मिती करत आहेत , ज्यापैकी 37 स्टैंडलोन सॅनिटाइजर प्लांट, 27 साखर कारखाने, 12 डिस्टलरी आणि 11 स्वतंत्र प्लांट आहेत. काही प्रमुख खाजगी क्षेत्रातील साखर निर्मॉत्यांनी, ज्यांनी अतिरिक्त हॅन्ड सॅनिटाइजर उत्पादन स्थापित केले आहे, त्यांनी ठोक उत्पादनावर लक्ष ठेवून निर्यात परवानगीसाठी निवेदन केले आहे.

उत्तर प्रदेशामध्ये हॅन्ड सॅनिटाइजर प्लांटला आता विदेशी खरेदीदारांकडूनही व्यापाराची चौकशी होत आहे. पण निर्यातीवर विचार करण्यापूर्वी सरकार घरगुती बाजारामध्ये पुरेसा पुरवठा निश्‍चित करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here