शिरोळ : महापुरामुळे श्री दत्त सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील बहुतांशी ऊस हा पुराच्या पाण्याखाली होता. त्यानंतर सद्यस्थितीतील कोरोना च्या संकटात दत्त चा गळीत हंगाम अनेक अडचणीतून यशस्वी ठरला आहे. सन 2019-20 च्या गळीत हंगामात कारखान्याने 10 लाख 47 हजार 867 मेट्रीक टन ऊस गाळप केला आहे.
यंदाचा हंगाम कारखान्यासाठी आव्हानात्मक होता. ऊस गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण होणार का, याबाबत अडचडणी निर्माण झाल्या होत्या. मात्र महापुरात बुडालेल्या ऊसाचे योग्य नियोजन करुन गाळप करण्यात आले. शिरोळ, हातकणंगलेसह कर्नाटक सीमा भागातून दत्त कारखान्याला ऊस पुरवठा केला जातो. पण सध्या गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 22 मार्चपासून सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. तरीदेखील कारखाना गाळप करण्यात यशस्वी झाला आहे.
याबाबत बोलताना कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, महापुरात बुडालेल्या ऊसाचे योग्य नियोजन करुन गाळप करण्यात आले. कोरोना विषाणूच्या संकटात ऊस उत्पादक शेतकरी यांनी दाखविलेला संयम, कामगार व ऊसतोड मजुरांनी जिवाची पर्वा न करता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर मात करीत हंगाम यशस्वी केला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.