ऊस दराबाबत दि. २६ नोव्हेंबरला कडेगावमध्ये कारखानदारांची बैठक

सांगली : यंदाच्या उसाला पहिली उचल ३ हजार १०० रुपये आणि गतवर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता १०० रुपये द्या, या मागणीवर स्वाभिमानी ठाम आहे. कडेगावमधील सोनहिरा कारखान्यावर रविवारी, दि. २६ रोजी बैठक होणार आहे. पहिल्यांदा कारखानदारांची बैठक होईल, त्यानंतर कारखानदार आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बैठक होणार आहे, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. खराडे म्हणाले की, ऊस दराच्या आंदोलनाबाबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी ही बैठक होणार आहे. बैठकीत सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा आहे. मात्र आमच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here