हरिद्वार : इकबालपूर साखर कारखान्याच्या साखर लिलाव प्रक्रियेतील अटी शिथिल करण्याचा आग्रह ऊस आयुक्तांनी तहसीलदार यांच्याकडे केला आहे. ते म्हणाले, या अटी शिथिल करुन शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. यावर तहसीलदारांनी शासनाकडून अनुमति घेऊन अटी मध्ये शिथिलता येण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास दिला.
ऊस आयुक्त ललित मोहन रयाल यांच्या द्वारे इकबालपूर साखर कारखान्याला प्रमाणपत्र गेल्यानंतर साखर लिलावाची योजना बनवण्यात आली होती. ३ सप्टेंबरला साखरेचा लिलाव करुन शेतकऱ्यांची देणी भागवायला हवी होती. पण, ज्यावेळी साखर खरेदी करण्यासाठी कारखान्यात गेलेल्या व्यापाऱ्यांनी जेव्हा लिलावाचे नियम पाहिले, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी लिलावातील अटी पाहून साखर खरेदी केली नाही. यामुळे कारखान्याशी संबंधित ऊस शेतकऱ्यांची थकबाकी मिळण्याची आशाही धूसर झाली.
शेतकऱ्यांची आर्थिक अडचण पाहून, ऊस सहायक आयुक्त शैलेंद्र सिंह यांनी भगवान पूरचे तहसीलदार सुशीला कोठीयाल यांच्याकडे अटी शिथिल कराव्यात असा आग्रह केला आहे. ऊस शेतकऱ्यांची थकबाकी देण्यासाठी साखर लिलावातील अटी शिथिल करुन या प्रक्रियेत सहकार्य करावे, अशी मागणी शैलेंद्र सिंह यांनी केली आहे.
याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून या अटीत शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले असल्याचे, शैलेंद्र सिंह यांनी सांगितले. जर या लिलाव प्रकियेतील अटी शिथिल झाल्या, तर साखरेचा लिलाव करुन शेतकऱ्यांची देणी भागवली जातील, असे ऊस सहायक आयुक्तांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.