रिलायंस ने ब्रिटिश पेट्रोलियमला मागे टाकले

नवी दिल्ली : आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडने नवा इतिहास रचला आहे. मंगळवारी 9.5 लाख कोटींचे बाजारमूल्य कमावणारी पहिली भारतीय कंपनी बनली होती. यानंतर बुधवारी ब्रिटिश पेट्रोलियम ला मागे टाकत तेल उत्पादन करणार्‍या कंपन्यांमध्ये सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.

मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर रिलायन्सचे बाजारमूल्य 138 अब्ज डॉलर झाले होते. तर ब्रिटिश पेट्रोलियमचे बाजारमूल्य 138 अब्ज डॉलर होते. यंदा रिलायन्सच्या शेअरमध्ये तीन पटींनी वाढ झाली आहे. ब्ल्यूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार शेअरच्या वाढीमुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती वाढून 56 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. यामुळे त्यांनी जॅक मा यांनाही मागे टाकले आहे.  मुकेश अंबानी यांनी कंपनीवरील कर्ज शून्यावर आणण्यासाठी रिलायन्सच्या तेल व रसायन व्यवसायातील 20 टक्के भांडवल सौदी अरेबियातील सौदी अरामको या कंपनीस विकण्यात येण्याच्या घोषणेसह अनेक उपाययोजनांची घोषणा केली होती.

पुढील 18 महिन्यांत कंपनीवरील सर्व कर्ज शून्यावर आणले जाईल, असे ते म्हणाले होते. अलीबाबाचे जॅक मा यांना मागे टाकून अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस काही वेळासाठी रिलायन्सचा ’एमकॅप’ पहिल्यांदा ब्रिटीश पेट्रोलियमच्या पल्याड गेला होता. त्यानंतर आज कंपनीच्या समभागांमध्ये तेजी दिसून आली आणि पुन्हा एकदा रिलायन्सने आघाडी घेतली

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here