सर्वसामान्यांना दिलासा : खाद्यतेलाचे दर कमी होण्याचे संकेत

कोल्हापूर : केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांपासून खाद्यतेलाचे दर आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. त्यासाठी आधारभूत किमतींवर सोयाबीन, सूर्यफूल खरेदी आणि सूर्यफूल, सोयाबीनच्या आयातीत वाढ सुरू ठेवली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खाद्यतेल, तेलबियांचा दर कमी होत आहे. त्यामुळे खाद्यतेल प्रती किलो ५ ते ८ रुपयांनी स्वस्त होऊ शकते, अशी शक्यता खाद्यतेल व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. खाद्यतेलाचे दर पुढील काही काळात कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.

सध्या सरकी १२० ते १२५ रुपये किलो, सूर्यफुल ११० ते १२५ रुपये किलो आणि शेंगतेल १८५ ते २२० रुपये किलो असे दर आहेत. सध्या लग्नसराई सुरू आहे. यामुळे खाद्यतेलाची मागणी आहे. घाऊक बाजारात तेलाची मागणी वाढली आहे. मात्र सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी हैराण आहे. सध्या किमान आधारभूत किमतीपेक्षा सोयाबीनचा भाव कमी आहे. आयात तेलबियांपासून बनवलेल्या खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याने बाजारात खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here