नवी दिल्ली: पाणीटंचाईपोटी चिंतेत असणार्या शेतकर्यांना देशात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. 1 जूनला पाउस सुरू झाल्यापासून तो सरासरीपेक्षा जास्त होता. चांगल्या पावसामुळे पेरणीस मदत होवून शेतकर्यांचा ताण कमी होईल.
हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, देशात मागील आठवडा ते 31 जुलै या कालावधीत 50 वर्षांच्या सरासरीपेक्षा 42 टक्के जास्त पाऊस झाला आहे . मागील आठवड्यांत, देशात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा 35 टक्क्यांनी खाली होता आणि तो मागील आठवड्यापूर्वी सरासरीपेक्षा 20 टक्के होता.
केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीनुसार, भारतातील 100 प्रमुख जलसाठ्यांपैकी 72 जलसाठयांमध्ये जलसाठा झाला आहे, जो साधारणत: 80 टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे. 25 जुलै पर्यंत गंगा, कृष्णा आणि महानदीसारख्या प्रमुख नद्यां खोर्यातील साठवण स्थितीत अजूनही घट आहे..
1 जून नंतर पावसाळी हंगाम सुरू झाल्यापासून एकूणच भारतात सरासरीपेक्षा 9 टक्क्यांनी कमी पाऊस झाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.