यवतमाळ : यंदा पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात महापूर आल्यामुळे या जिल्ह्यातील ऊस पाण्याखाली गेला. यामुळे ऊसाचे लागवड क्षेत्र ९o टक्यापर्यंत खाली आले आहे. याचा परिणाम या भागात असणाऱ्या अनेक साखर कारखान्यांवर होणार आहे. विदर्भात वाढलेले ऊस क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील काखान्यांसाठी मोठा दिलासा देणारे असले तरी, गाळपासाठी लागणारा आवश्यक तेवढा ऊस या भागातून जाणार नसल्याने कारखान्यांपुढे नवे संकट उभे आहे.
इथे पिकणाऱ्या ऊसाच्या भरवशावर एकेकाळी विदर्भातील साखर कारखाने चालत होते, पण आताच्या या महापुराने सारे चित्र बदलले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांनी आता ऊसाच्या लागवडीकडे पाठ फिरवली आहे. विदर्भातील ऊसाचा दिलासा देखील प. महाराष्ट्रासाठी मृगजळाप्रमाणेच ठरला आहे, कारण आवश्यक तेवढ्या ऊसाची गरज विदर्भ पुरवू शकत नाही. यामुळे ६० टक्के कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
संपूर्ण राज्यात नऊ लाख चार हजार हेक्टरवर ऊसाची लागवड होते. यावर्षी एक लाख चार हजार हेक्टर क्षेत्रातच ऊस उभा आहे. हे क्षेत्र निर्धारित क्षेत्रापेक्षा ९० टक्क्यांने कमी आहे. दहा टक्के ऊसावर कारखाने चालविण्याची कसरत करावी लागणार आहे.
विदर्भातील ऊस लागवडीने आज औरंगाबाद विभागालाही मागे टाकले आहे. विदर्भात ६३२७ हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे. औरंगाबाद विभागात ६९ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवडीचे नियोजन होते. प्रत्यक्षात सहा हजार हेक्टरातच लागवड थांबली.
कोल्हापूर विभागात दोन लाख ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात लागवड क्षेत्र ३१ हजार हेक्टर आहे. यातही पूर परिस्थितीने ८० टक्के क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे कोल्हापुरातून कारखान्यांना ऊस मिळणार नाही. पुणे विभागात तीन लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड होते. आज प्रत्यक्षात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लावला गेला. नाशिक विभागात २५ हजार हेक्टर, तर कोकणात २८५ हेक्टरवर उसाचे पीक घेण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात चार हजार २४२ हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. नागपुरात १५४४ हेक्टर क्षेत्रात ऊस लावण्यात आला. बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीतही ऊस उत्पादकांची संख्या वाढली आहे. ऊसाला अधिक पाण्याची गरज असल्यामुळे शेतकऱ्यांनी धान उत्पादक पट्ट्यातही ऊस लागवडीचा प्रयोग करण्यास प्रारंभ केला आहे. याचे मोठे बदल पाहायला मिळत आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पाणी टंचाईने ऊसाची लागवड घटली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.