नवी दिल्ली: भारतामध्ये जवळपास सहा महिन्यानंतर 24 तासाच्या अवधीमध्ये समोर आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या 20 हजारापेक्षा कमी आहे. तर आता तीन लाखापेक्षा कमी लोकांवर उपचार सुरु आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सकाळी आठ वाजता जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार कोरोनाचे 19,556 नवे रुग्ण समोर आल्यानंतर देशामध्ये संक्रमणाच्या केसस वाढून 1,00,75,116 झाल्या आहेत. तर 301 आणखी लोकांच्या मृत्युनंतर मृतांची संख्या वाढून 1,46,111 झाली आहे.
आकड्यांनुसार एकूण 96,36,487 लोक कारोनामुक्त होण्याबरोबरच देशामध्ये रुग्णांचा बरे होण्याचा दर वाढून 95.65 टक्के झाली आहे. तर कोरोनापासून मृत्यु दर 1.45 टक्के आहे. देशामध्ये उपचाराधीन लोकांची संख्या ही तीन लाखापेक्षा कमी झाली आहे. आता 2,92,518 लोकांवर कोरोंनाचे उपचार सुरु आहेत, जे एकूण रुग्णांच्या 2.90 टक्के आहे.