पाकिस्तान : लाहोरच्या न्यायालयाने चौधरी साखर कारखाना प्रकरणात मरियम नवाज आणि त्यांचे चुलत भाऊ यूसुफ अब्बास यांच्या न्यायालयीन कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी मरियम नवाज यांनी लाहोर उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, ज्यामध्ये आपले वडिल आजारी असल्याने, त्यांनी स्वतःला जामीन मिळण्याबाबत विनंती केली होती.
पाकिस्तानी सरकारच्या आर्थिक देखरेख करणाऱ्या यूनिटने चौधरी साखर कारखान्यामध्ये अरब रुपयांच्या भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, कारखान्यात अरब रुपयांची देवाण घेवाण झाली आहे. मरियम यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली गेली. कारखान्यात प्रमुख हितधारक असणाऱ्या तीन विदेशी लोकांनी मरियम नवाज यांच्या नावावर करोड रुपयांचे शेअर हस्तांतरित केले असल्याचा दावाही करण्यात आला