मुंबई: इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध हटविल्याने साखर कारखाने आणि डिस्टलरीजना मोठा दिलासा मिळाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीवर घातलेले निर्बंध हटविण्यात आले आहेत. केंद्र सरकारने मागील वर्षी डिसेंबरमध्ये उसाचा रस, बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे घेवून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनीही पाठपुरावा केला होता.
केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे आता नव्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना उसाचा रस, सिरप, बी हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे.केंद्र सरकाच्या इथेनॉल निर्मितीच्या निर्बंधांमुळे लाखो रुपये खर्च करून इथेनॉल प्रकल्प उभारलेल्या साखर कारखाने अडचणीत आले होते. मात्र, इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध हटविल्यामुळे हे प्रकल्प पुन्हा एकदा कार्यान्वित होणार आहेत.
इथेनॉल इंडस्ट्रीच्या अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.