लातूर : रेणा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने दिवाळीनिमित्त सभासदांना व कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे दसरा व दीपावली सणानिमित्त सभासदांना २५ रुपये किलो दराने ५० किलो साखर देण्यात येणार आहे. कारखान्याच्यावतीने १८ ते २६ ऑक्टोबर या काळात आठवड्यातील सुटीचे दिवस सोडून इतर दिवशी शेतकी विभागाच्या गट कार्यालयाच्या ठिकाणी साखर वितरण करण्यात येणार आहे.
माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख व आमदार धिरज देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे साखर वितरण करण्यात येत आहे. सर्व सभासदांनी कारखान्याच्या या सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे यांच्यासह सर्व संचालकांनी केले आहे.