रेणा साखर कारखान्यास राज्य पातळीवरील दोन पुरस्कार जाहीर

लातूर : कमी कालावधीत साखर कारखान्याची उभारणी करून उस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भाव देणाऱ्या रेणापूर तालुक्यातील दिलीप नगर (निवाडा) येथील रेणा सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्याकडून २०२२-२३ या वर्षातील सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता व उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन प्रथम पुरस्कार जाहीर झाले आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) येथे ११ जानेवारी रोजी वार्षिक सभेमध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या व अन्य मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

या पुरस्काराने ‘रेणा’च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. रेणा साखर कारखान्याची उभारणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे संस्थापक, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाली. कमी कालावधीत उभारणी करणारा व कर्जाची परतफेड करुन शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिकक्रांती घडवून आणणारा कारखाना म्हणून रेणा कारखान्याची ओळख आहे.सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ.धीरज देशमुख यांच्या नियोजनाने वाटचाल करत रेणा साखरने कारखानदारीत विविध विक्रम करुन राज्यातील सर्व साखर कारखान्यापुढे रेणा कारखान्याने आदर्श निर्माण केला आहे.

कारखान्याने गळीत हंगाम २०२२- २३ मध्ये मिल मधील उसाचा तंतूमय निर्देशांक, रिडयुस्ट मिल एक्स्ट्रक्शन, साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा, विजेचा, बगॅस वापर गाळप क्षमतेमध्ये वाढ, उत्पादन प्रक्रीया खर्च हा राज्याच्या सरासरी साखरेच्या उत्पादन प्रक्रियेपेक्षा कमी असल्याने, कारखान्याच्या तुलनेत इन्व्हेंटरी व्यवस्थापन सर्वोत्कृष्ठ आहे. याबददल कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव, माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ. धीरज देशमुख, कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे तसेच संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे सर्व सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शंकरराव कोल्हे साखर कारखान्यास पुरस्कार…

रेणा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत केलेला कै. विलासराव देशमुख सर्वोत्कष्ट उद्योजकता पुरस्कार सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप हे मानचिन्ह प्रशस्तीपत्र व एक लाख रुपये असे आहे. कारखान्याने यापूर्वी राष्ट्रीय साखर महासंघ (दिल्ली) यांच्यामार्फत देण्यात येणारे देश पातळीवर व वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, पुणे यांच्यामार्फत देण्यात येणारे तसेच राज्यस्तरीय महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना पुरस्कार व राज्य शासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कारसह विविध १४ पुरस्कार मिळवलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here