साखर कारखान्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण, पाच नोव्हेंबरपासून सुरु होणार गाळप

बुलंदशहर, उत्तर प्रदेश: गाळप हंगाम 2020-21 पाच नोव्हेंबरपर्यंत सुरु होईल. जिल्ह्यातील चारही कारखान्यांनी 80 टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. साखर कारखाना परिसर, बॉयलिंग कार्य आणि पावर हाउसचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा ऊस अधिकार्‍यानीं सर्व साखर कारखान्यांचे निरीक्षण करुन सर्व साखर कारखान्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

शेतकर्‍यांना गाळप हंगाम सुरु होण्यासाठी ,अधिक प्रतिक्षा करावी लागणार नाही. गाळप हंगाम 2020-21 आगामी पाच नोव्हेंबर ला सुरु होईल. साबितगढ च्या त्रिवेणी साखर कारखान्याने 85 टक्के, अगौता च्या एकल कारखान्याने 80 टक्के, अनूपशहरतील दी किसान राज्य साखर कारख़ान्याने 75 टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. बुलंदशहरातील वेव साखर कारखाना थकबाकी आणि दुरुस्ती मध्ये अजूनही मागेच आहे. इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत 65 टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. साखर कारखान्यांवर 128 करोड ची थकबाकी देय आहे.

सोमवारी अनामिका साखर कारखान्याने शेतकर्‍यांना सहा कोटी 68 लाख 79 हजार रुपये दिले आहेत. तरी अजूनही 21 करोड आठ लाख 89 हजार रुपये साखर कारखान्यांवर देय आहेत.

जिल्हा ऊस अधिकारी डीके सैनी यांनी सांगितले की, सर्व साखर कारखान्यांना थकाबाकी भागवण्याबाबत नोटीस देण्यात आल्या आहेत. वेव साखर कारखान्याला जिल्हाधिकार्‍यांकडूनही नोटीस देण्यात आली आहे. 85 टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. पाच नोव्हेंबर पर्यंत सर्व साखर कारखान्यात गाळप सुरु होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here