हरियाणा : पुरामुळे साखर कारखान्यात अडकलेल्या १२५ लोकांची सुटका

शाहाबाद : पुरामुळे परिस्थिती बिकट झाल्याने तिसऱ्या दिवशीही अनेक गावांसह साखर कारखान्यात बचाव अभियान राबविण्यात आले. १२ ट्रॅक्टर ट्रॉलींसह १२५ लोकांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. यावेळी आमदार रामकरण काला आणि कार्यकारी  संचालक राजीव प्रसाद हे पथकासह उपस्थित होते.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कलसाना-मोहनपूर पॉवर हाऊसच्या जवळ अडकलेल्या ७० गावातील लोकांना एकाचवेळी बाहेर काढणे शक्य झाले नसल्याचे अधिकारी सुमित बख्शी यांनी सांगितले. तेथे पाणी आणि खाद्यपदार्थ पोहोचविण्यात आले आहे. तेथे कोणतीही धोक्याची स्थिती नाही. दरम्यान, साठ तासानंतरही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. शहरी विभागात ४८ तासानंतर दोन तासासाठी वीज पुरवठा करण्यात आला. सामाजिक संस्थांनी पूरग्रस्त हुड्डा, सिद्धार्थ कॉलनी, विश्वास कॉम्प्लेक्स, एकता विहार, अटारी कॉलनी, बाबा बंदा सिंह बहादुर नगरमध्ये खाद्यपदार्थ पोहोचविले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here