कोल्हापूर : अथर्व-दौलत साखर कारखान्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगाराच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्याा चांगला पायंडा पाडला आहे, असे मत नोकरी मेळाव्याचे संकल्पक सुनील रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले. कारखान्याने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित नोकरी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष मानसिंग खोराटे होते.
गुट्टे म्हणाले की, कारखान्याने व्यावसायिक दृष्टिकोन सांभाळताना चांगले निर्णय घेतले आहेत. अथर्व प्रशासनाची कौतुकास्पद वाटचाल सुरू आहे. दरम्यान, मेळाव्यात १००४ उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी माजी मंत्री भरमू पाटील, शिवाजीराव पाटील, पृथ्वीराज खोराटे, अॅड. संतोष मळवीकर, विशाल पाटील, अशोक जाधव, संजय पाटील, शांताराम पाटील, अंगद जाधवर, शिवाजी सावंत यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कारखान्याचे युनिट हेड महेश कोनापुरे, नरेश रामपुरे, सेक्रेटरी विजय मराठे, जनसंपर्क अधिकारी दयानंद देवण व कामगारांनी मेळाव्याचे आयोजन केले होते.