उसाच्या उशीरा पक्व होणाऱ्या कोपीके ०५१९१ प्रजातीवर उत्तर प्रदेशमध्ये निर्बंध लागू

बागपत : ऊस विभाग तथा संशोधन परिषदेने ऊसाच्या नव्या प्रजातींची यादी जारी केली आहे. यामध्ये उसाच्या कोपीके ०५१९१ प्रजातीवर उशीरा पक्व होत असल्यामुळे बंदी घालण्यात आली आहे. आगामी हंगाम २०२३-२४ पासून या प्रजातीच्या लागण उसाची खरेदी केली जाणार नाही. तर फक्त खोडवा उसाची खरेदी कारखाने करतील. ऊस बियाणे तथा ऊस प्रजाती समितीने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांसाठी लागण करण्यासाठीच्या प्रजातींची यादी जारी केली आहे. यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये लवकर पक्व होणाऱ्या आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या प्रजातींचा क्षेत्रनिहाय समावेश आहे.

अमर उजालामधील वृत्तानुसार, शेतकऱ्यांना ऊस पिकाच्या लागणीसाठी समितीने मंजूरी दिलेल्या प्रजातीचा वापर करावा लागेल. त्रिस्तरीय बिज कार्यक्रमात ऊसाच्या ०२३८ या प्रजातीचा समावेश करण्यात आलेला नाही. सर्व विभागात लवकर पक्व होणाऱ्या प्रजातींमध्ये कोशा ८४३६, कोशा ८८२३०, कोशा ९५२५५, कोशा ९६२६८, कोसे ०३२३४, यूपी ०५१२५ (यूपी ०९४५३), कोसे ९८२३१, कोशा ०८२७२, कोसे ९५४२२, को ०२३८, को ०११८, को ९८०१४, कोशा १२२३१, कोशा १३२३५, कोलख १४२०१ आणि कोशा १७२३१ यांचा समावेश आहे. याबाबत जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अनिल भारती यांनी सांगितले की, ऊस विकास तथा संशोधन परिषदेकडून शेतकऱ्यांसाठी मंजुरी दिलेल्या बियाण्यांचे वितरण केले जाणार आहे. आगामी हंगामात ०५१९१ ही प्रजाती उशीरा पक्व होत असल्याने बंद केली जाईल. गळीत हंगामात केवळ त्याच्या खोडवा उसाची खरेदी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here