नांदेड : पोफाळीचा ७ वर्षापासून बंद पडलेला वसंत कारखाना पुन्हा सुरु झाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार असल्याचे मत मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले. मंत्री राठोड म्हणाले, हिंगोली परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून खा. हेमंत पाटील यांनी अत्यंत धाडसाने वसंत कारखाना शुरू करून शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक दर दिला. वसंत कारखान्यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
हिमायतनगरमध्ये आयोजित सर्व रोगनिदान आरोग्य शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ना. राठोड बोलत होते. यावेळी लोकनेते बाबुराव कदम- कोहळीकर, नांदेडचे आ. बालाजी कल्याणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, यवतमाळचे जि.प. सदस्य पितंगराव कदम, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, राम ठाकरे, असा संदेश पाटील आदी उपस्थित होते.