नवी दिल्ली : आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २.२४ कोटी करदात्यांना २.१३ लाख कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. विभागाने बुधवारी ही माहिती दिली.
या अंतर्गत एक एप्रिल २०२० ते २२ मार्च २०२१ या कालावधीत वैयक्तिक आयकर परताव्यांतर्गत ७९,४८३ कोटी रुपये आणि कंपनी कर परताव्यातून १.३४ कोटी रुपये परत देण्यात आले आहेत.
आयकर विभागाने याविषयी ट्वीटरवर दिलेल्या माहितीनुसार, सीबीडीटीने एक एप्रिल २०२० पासून २२ मार्च २०२१ पर्यंत २.२४ कोटी करदात्यांना २,१३,८२३ कोटी रुपयांहून अधिक कर रक्कम परत केली आहे. यामध्ये आयकर परताव्याच्या २,२१,९२,८१२ प्रकरणांमध्ये ७९,४८३ कोटी रुपये तर कंपनी परताव्याच्या माध्यमातून २,२२,१८८ प्रकरणांत १,३४,३४० कोटी रुपये परत देण्यात आले आहेत.