बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
नवी दिल्ली : चीनी मंडी
साखरेच्या घसरत्या किमतींमुळे चिंतेत असलेल्या साखर कारखान्यांनी आता आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी इथेनॉलकडे मोर्चा वळवला आहे. भविष्यातही कारखाने या व्यवसायावर ठाम राहण्याची शक्यता आहे. तेल वितरण कंपन्यांनी आता नव्याने १८ लाख ५० हजार लिटर इथेनॉल खरेदीसाठी नव्याने टेंडर काढली आहेत. त्या बी ग्रेड मळीपासून तयार करण्यात आलेल्या इथेनॉलचाही समावेश आहे.
साखर कारखान्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी डिसेंबर २०१८च्या तिमाहीमध्येही सरकारने मदत केली होती. इथेनॉलचा खरेदी दर वाढवून कारखान्यांना मदतीचा हात दिला होता. तसेच भविष्यातही सरकार याविषयावर कारखान्यांना कायमस्वरूपी मदत करण्याची चिन्हे आहेत.
या संदर्भात कोलकात्यातील स्टुअर्ट आणि मॅकार्थे वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचे विश्लेषक अभिषेक रॉय यांनी काही निरीक्षण मांडली आहेत. तिसऱ्या तिमाहीतील बलरामपूर साखर कारखान्याच्या कामगिरीबाबत रॉय म्हणाले, ‘
सरकारने डिसेंबर २०१८पासून इथेनॉलच्या किमतींमध्ये वाढ केली. त्याचा फायदा जानेवारी ते मार्च २०१९ या काळात दिसू लागले. तसेच २०१९-२० च्या हंगामात याचा सर्वाधिक फायदा दिसून येईल. मालाला चांगली किंमत आणि चांगली विक्री यांमुळे २०२०च्या आर्थिक वर्षातच नफ्याच्या पातळीवर सुधारणा होताना दिसतील.’
इथेनॉलचाच विचार करायचा झाला तर, गेल्या हंगामात इथेनॉलला सरासरी दर ३७.५ रुपये प्रति लिटर मिळाला होता. देशातील द्वारकिशेष शुगर्स, बीसीएमएल आणि बलरामपूर मिल्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या डिस्टलरी युनिटमधून फायदा झाल्याचे सांगितले आहे. कमी उत्पादन खर्च आणि चांगली विक्री यांमुळे ते नफ्यात आहेत. प्रत्येक कारखान्याची डिस्टवरी वेगवेगळ्या पातळीव आहे. काहींची क्षमता वाढवण्यात येत आहे जेणे करून त्यांना या संधीचा लाभ घेता येईल. अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रण सक्तीचे केले आहे. सरकार कारखान्यांना इथेनॉल उत्पादनासाठी प्रोत्साहनही देत आहे. पण, तरीही केवळ ६ टक्के इथेनॉल मिश्रणाचेच लक्ष्य आतापर्यंत पूर्ण करता आले आहे.
इंडियन शुगर मिल्स (इस्मा) या संस्थेच्या म्हणण्यानुसार, देशातील तेल वितरण कंपन्यांच्या मागणीपर्यंत पोहोचण्याचे टार्गेट आहे. कंपन्यांची मागणी ३ हजार २९२ लाख ६१ हजार लिटर इथेनॉलची आहे. तर देशातील साखर कारखाने केवळ ३ हजार १३७ लाख ३२ हजार लिटर इथेनॉलच पुरवू शकतात. तेल कंपन्यांनी
२५० कोटी लिटर इथेनॉलचे टेंडर काढले आहे. त्यातील केवळ १.१ टक्के म्हणजे केवळ ११० लाख लिटर इथेनॉलच आतापर्यंत पुरवण्यात आले आहे.
विश्लेषक भावेश गांधी यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सरकारने साखरेच्या किमतींवर नियंत्रण आणल्यानंतर बीसीएमएल डिस्टलरीने विक्रीमध्ये ३० टक्क्यांची तर मिळकतीमध्ये ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. ते म्हणाले, ‘पुढच्या वर्षी जाणवण्याची शक्यता असलेल्या साखरेच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर साठवणुकीचा दर्जा वाढवला पाहिजे. तसेच चीनमधील कंपन्यांच्या परिस्थितीच्या फायदा उठवण्यात आपण अपयशी ठरल्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत.’
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp