मंड्या : मंड्यामध्ये खूप वर्षांपासून बंद राहिलेल्या मायशुगर साखर कारखान्याचे शेतकऱ्यांच्या हितासाठी पुनरुज्जीवन केले जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, कारखान्याला सार्वजनिक – खासगी उद्योगांच्या भागीदारातून चालविण्याचा प्रयत्न केले सुरू होते. मात्र, शेतकरी या निर्णयाने नाखूश होते. त्यामुळे राज्य सरकारने या कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी ५० कोटी रुपये जारी केले आहेत. ते म्हणाले की, या विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दीर्घ काळापासून सुरू राहिलेल्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कारखाना पूर्ण क्षमतेने चालवला जाईल. मुख्यमंत्री बोम्मई मंड्या विद्यापीठातील सुविधांचे आणि नव्या भवनासह मंड्यातील अनेक विकासकामांच्या उद्घाटनानंतर बोलत होते.
रेशीम उत्पादन तथा युवक अधिकार मंत्री (Minister for Sericulture and Youth Empowerment) के. सी. नारायण गौडा यांनी सांगितले की, सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जीवनदायीनी ठरणाऱ्या या कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचे ठरवले आहे. त्यातून सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली वनचबद्धता दिसते. ते म्हणाले की, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आणि स्थानिक शेतकऱ्यांना आश्वासन दिले आणि त्याची पूर्तता केली.