क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी.बापू लाड कारखान्याच्या अध्यक्षपदी शरद लाड यांची निवड

सांगली : क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी शरद लाड तर उपाध्यक्षपदी भगवंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी यापुढेही कार्यरत राहू, अशी ग्वाही शरद लाड यांनी दिली. आमदार अरुणआण्णा लाड यांनी ज्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे, त्याला तडा जावू देणार नाही, असेही ते म्हणाले. स्वर्गीय डॉ. जी.डी.बापू लाड यांनी दाखविलेल्या सहकाराच्या वाटेवरूनच कारखाना वाटचाल करत असल्याचे आमदार अरुणअण्णा लाड यांनी सांगितले.

यावेळी संचालक दिलीप थोरबोले, अनिल पवार, जयप्रकाश साळुंखे, सुकुमार पाटील, वैभव पवार, सतीश चौगुले, संजय पवार, शीतल बिरनाळे, प्रभाकर माळी, अविनाश माळी, रामचंद्र देशमुख, जितेंद्र पाटील, संग्राम जाधव, अश्विनी पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here