खरीप विपणन हंगाम 2022-23 मध्ये भारत सरकारकडून धान खरेदी सुरळीतपणे सुरू आहे. किमान आधारभूत किंमत (एमएसपी) अंतर्गत 19.06.2023 पर्यंत केंद्रीय भांडारसाठी 830 लाख मेट्रिक टन (एलएमटी) पेक्षा जास्त धानाची खरेदी करण्यात आली आहे. केएमएस 2022-23 च्या चालू असलेल्या तांदूळखरेदी हंगामाचा आतापर्यंत 1.22 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे ज्यामध्ये एमएसपी प्रमाणे 1,71,000 कोटी रुपये थेट शेतकर्यांच्या खात्यात हस्तांतरित केले गेले.
खरेदी प्रक्रिया विनाअडथळा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था असेल हे सरकारने हे सुनिश्चित केले आहे . खरेदी केलेल्या तांदळाबरोबरचं तांदूळ वितरण व्यवस्था देखील प्रगतीपथावर आहे आणि 830 एलएमटी धानाच्या (यापैकी 558 एलएमटी तांदूळ आहे) खरेदी बरोबर, 19.06.2023 पर्यंत केंद्रीय भांडारमध्ये सुमारे 401 एलएमटी तांदूळ गोळा झाला आहे आणि आणखी 150 एलएमटी तांदूळ अद्याप गोळा होणे बाकी आहे. .
चालू रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) 2023-24 दरम्यान गहू खरेदी देखील सुरळीतपणे सुरू आहे. चालू हंगामात 19.06.2023 पर्यंत गव्हाची प्रगतीशील खरेदी 262 एलएमटी आहे. जी गतवर्षीच्या एकूण 188 एलएमटीच्या तुलनेत 74 एलएमटीने जास्त आहे. सुमारे 21.29 लाख शेतकर्यांना याआधीच चालू असलेल्या गहू खरेदी हंगामाचा लाभ झाला आहे ज्यात सुमारे 55,680 कोटी रुपये एमएसपीचा समावेश आहे. पंजाब, मध्य प्रदेश आणि हरियाणा या तीन राज्यांकडून अनुक्रमे 121.27 एलएमटी, 70.98 एलएमटी आणि 63.17 एलएमटी ची खरेदी करण्यात आली असून या राज्यांनी खरेदीत प्रमुख योगदान दिले आहे.
गहू आणि धानाच्या एकत्रित खरेदीसाठी यावर्षी शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या 2,05,896 कोटी रुपये देयकाच्या तुलनेत या वर्षी गहू आणि धानासाठी एमएसपी देयके एकत्रितपणे 2,26,829 कोटी रुपये इतकी आहे.
गहू आणि तांदूळाच्या सध्याच्या खरेदीमुळे, सरकारी अन्नधान्यांमध्ये पुरेसा अन्नधान्याचा साठा आहे. गहू आणि तांदूळ यांचा एकत्रित साठा 570 एलएमटी वर पोहोचला आहे ज्यामुळे देशाला अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी सोय उपलब्ध आहे.
(Source: PIB)