मधुबनी : जिल्हाधिकारी अरविंद कुमार वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात भात आणि तांदूळ खरेदीच्या सफलतेसाठी टास्क फोर्सची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदार आणि पीएसीएस अध्यक्षांच्या समस्या ऐकून घेवून आवश्यक त्या सूचना केल्या. सर्व कारखानदारांनी तांदूळ उत्पादनासाठी सरकारने निश्चित केलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करावे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पीएसीएसचे अध्यक्ष शेतकऱ्यांचे खाते स्वतः ठेवतात आणि त्यातून धान खरेदीसाठी रक्कम वाढवतात. जी अत्यंत खेदाची बाब आहे. ते म्हणाले की, सर्व ब्लॉक कोऑपरेटिव्ह अधिकाऱ्यांनी ही बाब तपासावी आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अन्य कोणी पैसे काढू शकणार नाही याची काळजी घ्यावी. जेणेकरून शेतकऱ्यांचे हित जपता येईल. धान खरेदीमध्ये कोणत्याही स्तरावर मध्यस्थांची भूमिका असू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. व्यवहारातील अनियमीततांविषयी कडक कारवाई करण्याची सूचना त्यांनी दिली. भात खरेदीचे उद्दिष्ट सर्वांनी पूर्ण करावे. नियमांचे उल्लंघन होवू नये याकडे लक्ष द्यावे असे आदेश त्यांनी दिले. यावेली डीडीसी विशाल राज, जिल्हा सहकार पदाधिकारी अजय कुमार भारती, सहाय्यक कृषी अधिकारी राकेश कुमार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक रमेश कुमार शर्मा आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी, कारखानदार उपस्थित होते.