हरिद्वार: जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ऊस आणि भाताचे पिक भुईसपाट झाले आहे. लालढांग विभागातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे यात नुकसान झाले आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून कोसळणारा पाऊस आणि त्यावेळी वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. लालढांग विभागातील पिके जवळपास कापणीसाठी तयार आहेत. अशा काळात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. ऊस पिक कोसळल्याने शेतकऱ्यांना तोडणीवेळी अडचणीला सामोरे जावे लागेल. भात पिकामध्येही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने आधीच उत्पादन घटले आहे. आता पावसाने यामध्ये नुकसानीत भर घातली आहे. शेतकरी सर्वजीत सिंह, सरबन सिंह, भरत सिंह, बच्चन सिंह, जयपाल, बाबूराम आदींनी शेतामधील उभ्या पिकाचे नुकसान झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. पिक कापणीची तयारी सुरू असताना नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.