ब्राझील : कोरोनाच्या घट्ट विळख्यामुळे सारे जग त्रस्त आहे. ब्राझीलमध्ये ही कोरोना प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, ब्राझीलमध्ये कोविड 19 च्या रुग्णांची संख्या 48,105 हून वाढून 1,49,858 इतकी झाली आहे. ब्राझीलमध्ये मरणार्यांची संख्या 1,252 हून वाढून 61,884 इतकी झाली आहे.
एक दिवसापूर्वी ब्राझीलमध्ये कोरोना वायरसची 46,712 इतकी प्रकरणे समोर आली होती आणि 1,038 लोकांचा मृत्यू झाला होता. संयुक्त राज्य अमेरिकेनंतर कोरोना वायरसच्या जागतिक स्तरावर ब्राजील दुसर्या स्थानावर आहे.
जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी नुसार, जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्च ला कोविड 19 च्या प्रकोपाला महामारी म्हणून घोषित केले होते. आजपर्यंत 10.9 मिलियन पेक्षा अधिक लोक जगभरामध्ये कोरोंना वायरसमुळे संक्रमित झाले आहेत, ज्यापैकी 519,000 लोकांचा मृत्यु झाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.