नवी दिल्ली : जागतिक स्तरावर साखरेचे दर गेल्या चार वर्षांतील उच्चांकावर पोहोचल्याने परदेशातून कच्च्या मालाची मागणी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामाच्या सुरुवातीला भारतीय कारखान्यांनी कच्ची साखर उत्पादनाची तयारी केली आहे. भारतीय कारखाने पारंपरिक रुपात स्थानिक खपावर आधारित पांढऱ्या साखरेचे उत्पादन करतात. निर्यातीसाठी खूप कमी कच्ची साखर तयार केली जाते. मात्र, जगातील सर्वाधिक साखर उत्पादक आणि निर्यातदार देश ब्राझीलमध्ये उसावर थंडी आणि दुष्काळाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे डिसेंबरच्या तिमाहीत जागतिक बाजारपेठेत संभाव्य साखर पुरवठ्यावर त्याचा परिणाम दिसणार आहे. त्यामुळे भारतीय कारखान्यांना परदेशात कच्च्या साखरेच्या उत्पादनाला बळ मिळाले आहे.
मनीकंट्रोल डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. थोम्बरे यांनी सांगितले की, कच्च्या साखरेसोबत आम्ही हंगामाची सुरुवात करण्याची तयारी केली आहे. पांढऱ्या साखरेच्या तुलनेत कच्च्या साखरेची निर्यात सुलभ आहे. त्याचे दरही चांगले आहेत. आणि हे दर स्थिर राहतील अशी शक्यता आहे. भारतीय साखर निर्यात जागतिक दरांवर आधारित आहे. आशियाचा पुरवठा वाढण्याचीही शक्यता आहे. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार वितरकांनी सांगितले की, कारखान्यांनी नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान ७,२५,००० टन कच्ची साखर आणि ७५००० टन पांढऱ्या साखरेच्या निर्यातीचे करार केले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link