नवी दिल्ली : जागतिक स्तरावरील साखरेचे दर देशातील साखर उद्योगाचा उत्साह वाढविणारे आहेत असे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) महासंचालक अविनाश वर्मा यांनी म्हटले आहे.
वर्मा यांनी सीएनबीसी – टीव्ही १८ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, जागतिक बाजारपेठेतील साखरेचे दर पु्न्हा २० सेंटने वाढले आहेत. कोरड्या हवामानामुळे ब्राझीलमधील साखर उत्पादन गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे. थायलंडमधील साखर उत्पादन अद्याप पूर्ववत स्थितीला आलेले नाही. त्यामुळे जागतिक बाजारातील किमती तेजीत राहतील असे मला वाटते असे वर्मा यांनी स्पष्ट केले.
वर्मा यांच्या म्हणण्यानुसार, भारतात यंदा साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. ही साखर निर्यात करण्यायोग्य आहे. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे चढे दर आणि देशातील अतिरिक्त साखर उत्पादन हे सकारात्मक संकेत आहेत. दोन वर्षांपूर्वी हंगामाच्या सुरुवातीला १४.५ मिलियन टनावर पोहोचलेला सुरुवातीचा साखर साठा आता ८.५ मिलियन टनावर आला आहे. तरीही आता जागतिक बाजारात चांगले दर आहेत. त्यामुळे आपण आता अनुदानाविना आंतरराष्ट्रीय बाजारात साखर निर्यात करू शकतो. ही भारतीयांसाठी सकारात्मक बाब आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link