सातारा: गळीत हंगाम २०२४-२५ साठी येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झाले.कारखान्याचे संचालक डी.बी.जाधव यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी संचालक मंडळ उपस्थित होते.
आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याने जय्यत तयारी सुरू केल्याचे सांगण्यात आले.ऊस तोडणीसाठी तोडणी मुकादम आणि वाहतुकदारांशी करार केले जात आहेत.सभासदांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पाठवावा असे आवाहन करण्यात आले.यावेळी व्हाईस चेअरमन लक्ष्मी गायकवाड, मानसिंगराव जगदाळे, कांतीलाल पाटील, लालासाहेब पाटील, अविनाश माने, वसंतराव कणसे, रामचंद्र पाटील, संजय थोरात, पांडुरंग चव्हाण, सर्जेराव खंडाईत, रामदास पवार, संतोष घार्गे, लहूरज जाधव, संजय कुंभार, जयवंत थोरात, शारदा पाटील, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील आदींसह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.