ऊस दर जाहीर करण्याची रालोदची मागणी

अमरोहा : रालोदने ऊस दर लवकर जाहीर करण्याच्या मागणीसाठी २६ डिसेंबरपासून लखनौमध्ये आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. अमरोहा येथे आलेल्या रालोदचे राष्ट्रीय सरचिटणीस मुन्शीराम पाल यांनी याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करत कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांची एकजूट करण्याचे आवाहन केले. बुधवारी दुपारी रालोदचे जिल्हाध्यक्ष मनवीर सिंग चिकारा यांच्या निवासस्थानी बोलताना मुंशीराम पाल सिंग म्हणाले की, राज्य सरकारने २३ डिसेंबरपर्यंत उसाचा योग्य भाव जाहीर न केल्यास २६ डिसेंबर रोजी लखनौमध्ये आंदोलन करण्यात येईल. आंदोलनाला पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांतील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित राहतील.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुन्शीराम पाल सिंग म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उसाला रास्त भाव देणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारने उसाचा दर ४५० रुपये प्रती क्विंटल जाहीर करावा. त्याच्या खाली तडजोड केली जाणार नाही. अलिकडील काळात शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना लहरी हवामानाचा फटका बसत आहे. सरकारने शेतकऱ्यांना उसाची थकबाकी व्याजासह देण्यासह पिकांच्या सिंचनासाठी दिलेले मोफत विजेचे आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी

रालोदचे विभागीय अध्यक्ष रामवीर सिंग, हरपाल सिंग, प्रशांत औलख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here