रालोदची ऊस दरासाठी निदर्शने, तीव्र आंदोलनाचा इशारा

मेरठ : ऊस दराची घोषणा करणे आणि उसाची थकबाकी देण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय आंदोलनाचा भाग म्हणून रालोदने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सरकारच्या स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही झाली नाही तर जिल्हाधिकारी, आयुक्तांना घेराव घातला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राष्ट्रीय लोक दलाचे नेते, कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत इतर मागण्यांसाठी मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. रालोदचे प्रदेश प्रवक्ते सुनील रोहटा, विनय मल्लापूर म्हणाले की, साखर कारखाने सुरू होवून चार महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप ऊस दर निश्चित करण्यात आलेला नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचे हित पाहात नाही. रालोदचे जिल्हाध्यक्ष मतलुब गौड म्हणाले की, मोकाट जनावरांच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल आहेत. त्यावरही कारवाई करण्याची गरज आहे. यावेळी महानगर अध्यक्ष दिलशाद सैफी, उज्ज्वल अरोरा, माजी आमदार राजेंद्र शर्मा, सुरेंद्र शर्मा, सोहराब ग्यास, फुरकान अलवी, फिरोज सैफी आदी सहभागी झाले होते. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here