मेरठ : रालोदने थकीत ऊस बिले देण्याची मागणी करत जिल्हा ऊस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.
जोरदार पाऊस सुरू असूनही मोठ्या संख्येने शेतकरी रालोदच्या कार्यालयात एकत्र आले. तेथून ते जिल्हा ऊस अधिकारी कार्यालयावर पोहोचले. तेथे कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर उप जिल्हाधिकारी अमित सिंह, जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी आंदोलनस्थळी आले. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचे पैसे दिले आहेत. फक्त भैसाना कारखान्याकडे मोठी थकबाकी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाध्यक्ष प्रभात तोमर यांनी सांगितले की, ज्या साखर कारखान्यांकडे पैसै थकीत आहेत, त्यांनी तातडीने ते द्यावेत. भैसाना साखर कारखान्याचे पैसे सरकारने स्वतःच्या स्तरावर द्यावेत. तरच शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळू शकतील. अधिकाऱ्यांनी लवकरच पैसे देण्याची प्रक्रिया केली जाईल असे सांगितले. यावेळी उप जिल्हाधिकाऱ्यांकडे राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले. कमल गौतम यांनी नियोजन केले.
माजी मंत्री धर्मवीर बालियान, योगराज सिंह, विभागीय शेतकरी संघाचे अध्यक्ष उधम सिंह, नौशाद खान, अजीत राठी, धर्मेंद्र राठी, कृष्णपाल राठी, मास्टर राजपाल सिंह, भूपेंद्र प्रधान, सोमपाल सिंह बालियान, देवेंद्र मलिक, विदित मलिक, सार्थक लटियान आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link