सातारा : किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या २०२३ – २०२४ हंगामासाठीचे रोलर पूजन चेअरमन आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाटील म्हणाले कि, किसन वीर आणि खंडाळा साखर कारखान्याचा २०२२ – २३ गळीत हंगामातील शेतकऱ्यांची ऊस बिल देणी, तोडणी वाहतूक कंत्राटदारांची फायनल बिले तसेच सर्व व्यापारी देणी देण्यात आलेली आहेत. ऊस उत्पादकांच्या हितासाठी किसन वीर आणि खंडाळा कारखाना पुन्हा सुरु करण्यात यश आले आहे. २०२३ – २४ हंगामासाठी दोन्ही कारखान्याचे १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहितीही आ. पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस किसन वीर आणि खंडाळा कारखान्याला पाठवून गाळप हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन आ. मकरंद पाटील यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन आणि कारखान्याचे संचालक नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही.जी.पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, शशिकांत पिसाळ, बाबासाहेब कदम, प्रल्हादराव चव्हाण आदी उपस्थित होते.