सोलापूर : माढा तालुक्यातील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्यात कारखान्याचे संस्थापक, चेअरमन धनाजीराव साठे यांच्या हस्ते २०२३ – २०२४ गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन करण्यात आले. यावेळी साठे म्हणाले कि, पुढील गळीत हंगामासाठी कारखान्यासाठी सुमारे साडेसात हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. साडेतीन लाख टन ऊस गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक दादासाहेब काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी व्हाईस चेअरमन सुधीर पाटील, राहुल पाटील, हरिदास खताळ, नारायण गायकवाड, संजय इंगळे, विठ्ठल शिंदे, भालचंद्र पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी, कामगार, शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होता.