विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड कारखान्यात रोलर पूजन समारंभ उत्साहात

सोलापूर : माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत शिंदे यांनी चालू वर्षाच्या ऊस उपलब्धतेविषयी माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. यावर्षी कमी कालावधीत जास्त ऊस गाळप करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या १७ व्या गाळप हंगामासाठीचे रोलर पूजन कार्यकारी संचालक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी गाळप तयारीचा आढावा घेतला.

यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. रणवरे, असिस्टंट जनरल मॅनेजर वैभव काशीद, केन मॅनेजर सुनील बंडगर, डिस्टलरी मॅनेजर अनिल शेळके, मुख्य वित्तीय अधिकारी भास्कर गव्हाणे, डेप्युटी चीफ इंजिनिअर सिद्धेश्वर शिंदे, पर्चेस अधिकारी कल्याण पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रदीपकुमार पाटील, सुहास वेदपाठक, एच. आर. मॅनेजर परमेश्वर माळी, सुरक्षा अधिकारी सचिन शिंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here