पाथरी : माजी आमदार तथा योगेश्वरी शुगर्सचे चेअरमन आर. टी. देशमुख यांच्या हस्ते कारखान्याच्या नव्या, २०२४-२५ या गळीत हंगामाचा रोलर पुजनाचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी ११ वाजता झाला. यावेळी कारखान्याचे संचालक राहुल देशमुख, डॉ. अभिजीत देशमुख, प्रमोटर लक्ष्मीकांत घोडे, सुदाम सपाटे, जनरल मॅनेजर प्रकाश चांदगुडे हे प्रमुख उपस्थित होते. तत्पुर्वी ग्रामदैवत हनुमंतरायाचे पूजन करून शेतकी विभागाच्या तोडणी, वाहतूक यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला.
त्यानंतर कारखान्यात मिल रोलर पूजन कार्यक्रमाची सुरुवात झाली. मोहन जोशी यांनी पौरोहित्य केले. कारखान्याचे वर्क्स मॅनेजर साखरे, चीफ केमिस्ट नवनाथ चौधरी, ऑफिस मॅनेजर राजकुमार तौर, केन मॅनेजर पी. जी. गायकवाड, चिफ अकाउंटंट मुकेश रोडगे, सुरक्षा अधिकारी वाघमारे, प्रगतशील शेतकरी किरण घुंबरे, पिंटू घुबरे, ऊसतोड वाहतूक ठेकेदार नारायण राठोड, मंकाजी शिंदे, प्रल्हाद चव्हाण, गजानन सपाटे आदी उपस्थित होते.